अकोला : येथील श्रीराजराजेश्वर मंदिरात गुडघेदुखीसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राजस्थानहून आलेल्या डॉक्टरांकडून रुग्णांच्या गुडघ्यांची तपासणी मोफत करण्यात येणार असून सल्लाही दिला जाणार आहे. गुडघेदुखीने त्रस्त लोकांवर जर्मन तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जातील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना ऑपरेशन करण्याची गरज नाही. ऑपरेशनशिवायही रुग्णाला चालता येते आणि तेही बेदनाविना. २ एप्रिल ते ६ एप्रिल या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राजस्थानचे डॉ. भूपेंद्र चौधरी आणि डॉ. विक्रम मलाल आपली सेवा देणार आहेत. ज्यांना ऑपरेशन करायचे नसेल त्यांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ अशी आहे.








