अकोला : आरोपीने स्वतःच्या व्यवसाय वाढवण्याकरिता साडेतीन लाख रुपये ठेव चिठ्ठीवर तक्रार करते कडून घेतले होते. सदर हुंडीच्या पैशापोटी धनादेश देण्यात आला होता सदर धनादेश बँकेमध्ये लावला असता अनादर झाला. त्यामुळे फिर्यादीने न्यायालयात खटला दाखल केला सदर प्रकरणांमध्ये फिर्यादी दीपश्री अरुण अग्रवाल यांनी आरोपी उत्सव ट्रेडर्स प्रोप्रायटर पवन रामकिसन अग्रवाल (सोनालावाला) यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. सदर खटल्यात विद्यमान अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एस. कोलते यांनी आरोपीला सदर प्रकरणात दोषी ठरवून आरोपी पवन रामकिसन अग्रवाल (सोनालावाला) यास एक वर्ष कारावासची शिक्षा आणि साडेतीन लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त तुरुंगवास ची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यात फिर्यादीच्या वतीने विधीज्ञ सुमित महेश बजाज यांनी बाजू मांडली तसेच विधीज्ञ वर्षा सदार, विधीज्ञ कुणाल शिंदे, विधीज्ञ मोनिका श्रीराव यांनी सहकार्य केले.








