कोतवाली चौकात विहींप रामनवमी शोभायात्रा समितीचा कालिया मर्दन देखावा प्रारंभ
अकोला – स्व. आ गोवर्धन शर्मा प्रणित विहीप – रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने महानगरात रामनवमी उत्सवात अनेक उपक्रम मोठ्या थाटात सुरू असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने सिटी कोतवाली चौकात समितीची विहंगम कृष्ण अवतार कालिया मर्दन झाकी साकार करण्यात आली. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट ने साकार केलेली ही झाकी शुक्रवारी मोठ्या भक्तिभावात प्रारंभकरण्यात आली. या झाकी प्रारंभप्रसंगी आ रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, श्रीमती गंगादेवी शर्मा, जेष्ठ समाजसेवी गोपाल खंडेलवाल, अशोक गुप्ता, वसंत बाछूका, माजी महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, विहीप रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवा धिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा, श्रीरामनवमी शोभायात्रा
समितीचे अध्यक्ष शैलेंद्र उर्फ बंटी कागलीवाल, विहिपचे अध्यक्ष प्रकाश लोढिया, समितीचे कोषाध्यक्ष राहुल राठी, विहिपचे प्रांत सहमंत्री गणेश काळकर, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, प्रकाश घोगलिया आदी उपस्थित होते. यावेळी भगवान श्रीराम व स्व माजी आ गोवर्धन शर्मा यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाचा प्रारंभकरण्यात आला. यावेळी सामूहिक महाआरती करण्यात आली. पंडित हेमंत शर्मा यांनी पूजाविधी पार पाडली. संचालन बाळ बिडवाई यांनी तर आभार समिती अध्यक्ष शैलन्द्र कागलीवाल यांनी मानलेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत
व्यक्त करीत संपूर्ण अकोलेकर नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भगवान श्रीरामाच्या रामनवमी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. आईस्क्रीम वितरणाने या प्रारंभसोहळ्याचे समापन करण्यात आले. या सोहळ्यात समितीचे माजी अध्यक्ष विलास अनासने, रामप्रकाश मिश्रा, ब्रिजमोहन चितलागे, डॉ. अभय जैन, शैलेश खरोटे, हरिओम पांडे, संजय दुबे, निलेश पाठक, अमर कुकरेजा, राजु मंजुळकर, सिद्धार्थ शर्मा, नविन गुप्ता, मनीष बाछूका, रमेश चांडक, अजय सेंगर, अजय शर्मा, विजय इंगळे, संदिप निकम, संदीप वाणी, रोशन जैन, विजय डहाके, प्रताप विरवाणी, आकाश
ठाकरे, नितीन जोशी, अरुण शर्मा, डॉ प्रियश शर्मा, सुमित शर्मा, प्रा अनुप शर्मा, प्रा राम बाहेती, शंकर खोवाल, संतोष बुरडे, निलेश नागोसे, राधेश्याम शर्मा, मनोज कस्तुरकर, संतोष पांडे, विकी ठाकूर, सुनील कोराडिया, महेंद्र खंदेडिया, रितेश चौधरी, अक्षद कागलीवाल, पवन ठाकूर, रोहित ठाकूर, गुरुचरण ठाकूर, सतपाल ठाकूर, बाबू बागडे, रोहित तारकस, सौ मंजुषा सावरकर, सौ अर्चना शर्मा, पुष्पा वानखडे, आरती शर्मा, ज्योती टोपरे, मनीषा भुसारी, रेखा नालट, सारिका देशमुख, चित्रा बापट, छाया थोडसं, चंदा ठाकूर, कल्पना अडसुले, सुमनताई गावंडे, मालती रणपिसे, सुरेखा नबापुरे, आरती शर्मा, संतोष शर्मा, आरती घोगलिया, अलका देशमुख, वसुधा बिडवई, सोनल ठक्कर, उमा शर्मा, कल्पना कागलीवाल, मीना कागलीवाल, समवेत विहीप रामनवमी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी, सेवाधारी, महिला समितीच्या महिला व रामभक्त नागरिक उपस्थित होते.








